---Advertisement---

बलात्कारी बाबा…रुपाली चाकणकरांकडून पाय धुऊन पूजा; VIDEO VIRAL

March 19, 2026 12:25 PM
---Advertisement---

समाजात सध्या स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबांचा चांगलाच सुळसुळाट वाढला आहे. त्यातंच नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये ज्योतिषी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, योन शोषणाचे आरोप आहेत. शिवाय, त्याच्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.

कोण आहे हा बलात्कारी ज्योतिषी?

अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ खरात असं या ज्योतिषी बाबाचं नाव आहे. अनेक राजकारणी लोकांसोबत त्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे. नाशिक पोलिसांनी आज (दि.18 मार्च) पहाटे त्याला अटक केली आहे.श्री शिवनिका संस्थान, मिरगाव (तालुका, सिन्नर, जिल्हा नाशिक) येथील तो अध्यक्ष आहे. त्याला अटक केल्यानंत त्याचं बिंग फुटलं आहे. तसेच, आता त्याचे कोणाकोणासोबत संबंध आहेत? कोणत्या राजकीय नेत्यांना त्याचा वरदहस्त आहे? हे समोर येऊ लागले आहे.

रुपाली चाकणकर अडचणीत?

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी चक्क बलात्कारी बाबाचे पाय धुतले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे समोर आणले आहे. दमानिया यांनी ट्विट करून रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबत संबंध असल्याचे समोर आणले आहे. दमानिया यांनी काही व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. फोटोत रुपाली चाकणकरांनी खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचं दिसत आहे. तर दुऱ्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर खरातचे पाय धुऊन त्याची पूजा करताना दिसत आहेत. यावरून आता चांगलंच राजकारण रंगलं आहे.

Image

दमानियांचं ट्विट…

“बलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरतांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ ? खूप वर्ष त्यांना ह्या ओळखतात? त्यांच्या संघटनेवर ? त्यावर पदाचा पण उल्लेख. ह्या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे. लवकरच खुलासा करेन”, असं ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

चारी-बाजूंनी आरोप होत असताना रुपाली चाकणकरांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्यात देखील बलात्कार प्रकरणातील आरोपीचा आदरपूर्वक उल्लेख केलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असूनही चाकणकर यांनी आरोपीचा उल्लेख कसा केलाय? हे समजून घेऊयात..

Image

काय म्हटलंय चाकणकरांनी?

“शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे”, असं रुपाली चाकणकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणावरून मात्र रुपाली चाकणकरांवर टीका केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment