---Advertisement---

गॅस एजन्सीकडून आवाहन; लगेच ‘हे’ करा नाहीतर होईल आर्थिक नुकसान

August 3, 2026 12:14 PM
---Advertisement---

अविनाश इंडेन गॅस एजन्सी, वालचंदनगर यांच्या वतीने उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी तसेच सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी दि. 3 व 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बळीराजा सांस्कृतिक भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती (शेजारी), वालचंदनगर येथे विशेष ई-केवायसी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या ग्राहकांना भविष्यात एलपीजी गॅस सबसिडी बंद होणे तसेच गॅस कनेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी संबंधित ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराचा लाभ घेऊन सर्वांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी, अशी नम्र विनंती व्यवस्थापक तेजस थोरात अविनाश इंडेन गॅस एजन्सी, वालचंदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment