---Advertisement---

महाराष्ट्राचा आसाराम… महिलांना स्वतःची लघवी पाजायचा अन्..

March 19, 2026 12:27 PM
---Advertisement---

महाराष्ट्राचा आसाराम बापू म्हणजेच नाशिकमधील स्वतःला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा अशोक खरात. याचे काळे धंदे आता समोर येऊ लागले आहेत. बलात्काराच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

नाशिक क्राइम ब्रँचने बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या विकृत प्रकारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातचा विकृतपणा वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. कथित ज्योतिषी त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

महिलांना पाजायचा स्वतःची लघवी..

अशोक खरात नाशिकमधील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली त्या भक्तांशी वेडेचाळे करत असायचा. काळ्या काचांच्या ऑफिसमध्ये तो महिलांशी अश्लील कृत्य करायचा. कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये तो महिलांना ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं बोलवत स्वतः लघुशंका करुन तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:ला ज्योतिष म्हणणाऱ्या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झाला आहे. खरातची काळी कृत्य उघ़ड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे.

गुगंची औषध अन् पॉर्न व्हिडिओ..

खरातनं गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हीडिओही पोलीस तपासात उघडकीस आलेत. सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे.

राजकारण्यांचा गुरु..

या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरदेखील आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली चाकणकरांनी स्वतः तो माझा गुरु असल्याचं एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment