---Advertisement---

कॅप्टन अशोक खरातांवरील आरोपाबाबत मला काहीही माहिती नाही- चाकणकर

March 19, 2026 12:28 PM
---Advertisement---

स्वतःला ज्योतिषी बाबा म्हणून मिरवणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातचा बाजार उठला आहे. त्याचे काळे कारनामे समोर आले आहेत. त्याला महिलांवर बलात्कार आणि आणखी किळसवाणे घाणेरडे प्रकार केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याचे राजकीय संबंध समोर येऊ लागले आहेत. यात पहिलं नाव समोर आलं ते म्हणजे महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं.

अंजली दमानियांकडून चाकणकरांची पोलखोल-

दमानियांचं पहिलं ट्विट- 

ठबलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरतांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ ? खूप वर्ष त्यांना ह्या ओळखतात? त्यांच्या संघटनेवर ? त्यावर पदाचा पण उल्लेख. ह्या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे. लवकरच खुलासा करेन”, असं दमानियांनी म्हटलं.

दमानियांचं दुसरं ट्विट- 

“या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.. या ज्यांचे पाय धुवत आहेत त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे! या गुरुजींकडे इतर महिलांचे व्हिडिओ आढळले.अशा लोकांचे पाय धुणाऱ्या महिलांना न्याय देऊ शकणार नाही! किमान पदावर दूर होण्याचे सौजन्य दाखवा…जनाची नाहीतर मनाची तरी… #राजीनामाद्या”, असं दमानियांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं. यावेळी त्यांनी रश्मी पुराणीक यांची पोस्ट रिट्विट केली.

रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया- 

“शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे”, असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आलीय. नाशिक क्राइम ब्रँचने बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या विकृत प्रकारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातचा विकृतपणा वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. कथित ज्योतिषी त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

कदाचित देऊळ आणि 'orm 제1 मोपजी गोप्ब जिद 13/e/マャet श्री शिवनिका संस्थान, मिरगांव पु.पो निरगाच, ता. सिंद्रार, जि. नारिक. पिरणांव ४२२ Por shuivania.xemsiliam@prail.cm @ .". * विद्यमान कार्यकारी मंडळ (ट्रस्टी) १. कॅष्टन अशोककुमार एकनाथ खरात अध्यक्ष श्री. राजेंद्र भागवतराव घुमरे उपाध्यक्ष ३.श्री. ર. श्री. नामकर्ण यशवंत आवारे सरचिटणीस ना. सौ. रुपाली निलेश चाकणकर अध्यक्षा, राज्य महित्ता भायोग, महाराष्ट्र राज्य सदस्या ५.श्री. श्री. सुभाषराव केशवराव गमे y. सदस्य ... श्री. ललित प्रकाश पोफळे सव्स्य' सांगणारा मजकूर ची इमेज असू शकते

शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment