---Advertisement---

रुपाली चाकणकरांचे खळबळजनक फोटो… हात धरला, तोंडात घातला घास

March 19, 2026 12:22 PM
---Advertisement---

महाराष्ट्राचा आसाराम बापू म्हणजेच बलात्कारी ज्योतिषी बाबा अशोक खरात. त्याला महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या कारनाम्याने महाराष्ट्र हादरला आहे. लोकांचा चेहरा पाहून भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातने अनेक महिलांचं शोषण केल्याचे उघड झालं आहे. खरात हा एका ३५ वर्षीय महिलेवर मागील २ वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. त्याने महिलेला तुझा नवरा मरेल, माझी गर्लफ्रेंड हो, अशी भीती सांगून महिलेवर अत्याचार करत होता. या महिलेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर अशोक खरातची कुंडली समोर आली. या अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. 7 दिवस त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकारण्यांचे संबंध

आता त्याचे आणि राजकारण्यांचे संबंध असल्याचे खुलासे समोर येऊ लागले आहेत. पहिलं नाव आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकराचं. रुपाली चाकणकरांचा तो गुरु असल्याचं त्यांनीच म्हटलं आहे. यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकरांना चांगलंच घेरलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबतही खरातचे फोटो व्हायरल झाले आहेत.

शरद पवारांच्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

“या फोटोंची स्टोरी काय आहे? आदरणीय रुपाली चाकणकर मॅडम जरा खरेखुरे स्पष्टीकरण दिल्यास सर्वांना कळेल की तुम्ही लबाड नाहीत. आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचेही गैरसमज दूर होतील”, असे ट्विट शरद पवार गटाचे नेते विकास लंवांडे यांनी केले आहेत. सोबतच रुपाली यांनी बलात्कारी ज्योतिषी बाबा अशोक खरातचा हात धरल्याचा आणि त्यांना घास भरवतानाचे 2 फोटो ट्विट केले आहेत. यावरून राज्यात खळबळ माजली आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment