बारामती-कळंब-बावडा-निरा नरसिंहपूर (बीकेबीएन) मार्गावर निमसाखरमध्ये (१९ एप्रिल) गौरव पेट्रोलियमजवळ भररस्त्यात कोल्हा वाहनाच्या धडकेत मृतावस्थेत आढळून आला. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. वन्यजीव संरक्षक संस्थेचे उपाध्यक्ष अमित अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अडसूळ सरांनी वनसंरक्षक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनसंरक्षक अधिकारी वाघमोडे यांनी घटनास्थळावर दाखल होतं शव हस्तगत करून शवाचा पंचनामा केला. वाहनचालकांनी रात्रीच्या वेळेस वाहन कमी गतीने चालवणे आवश्यक आहे. तसेच एखादा वन्यजीव रस्त्यावर दिसल्यास ब्रेक मारणे गरजेचं आहे. जखमी प्राणी पक्षी किंवा साप आढळल्यास वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. +917304040516 , 88880 67271 , 9975787076
कोल्ह्याबद्दल थोडक्यात माहितीः
भारतीय कोल्ह्याची उंची ३८-४३ सेंमी, शरीराची लांबी ६०-७५ सेंमी आणि वजन ८-११ किलो दरम्यान असते. आहार: कोल्हे हे मिश्राहारी असतात. ते लहान सस्तन प्राणी, फळे, बेरी आणि कीटक खातात. कोल्हे आपली बिळे स्वतः तयार करतात किंवा इतर प्राण्यांच्या सोडून दिलेल्या बिळात राहतात.
निमसाखरमध्ये मृतावस्थेत आढळला कोल्हा
April 20, 2026 10:05 PM
---Advertisement---






