---Advertisement---

धक्काबुक्की, पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी; शरद पवारांच्या लवांडेंवर शाईफेक

May 9, 2026 6:48 PM
---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काही व्यक्तींनी शाई फेकत त्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. वारकरी संप्रदायातील आणि गोरक्षक असलेल्या तरुणांनी आपल्यावर हा जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. या हल्लेखोरांकडं पिस्तूलही होते, असा दावा त्यांनी केला आहे. सोशल मिडीयावरती पोस्ट करत लवांडे यांनी या घटनेची माहिती दिली आहे, त्याचबरोबर लवांडे यांच्या अंगावरती शाई ओततानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केली आहे. तर नेमकी घटना काय घडली, त्यांना काय म्हणूत धमकावलं, कोण लोक होते, किती लोक होते, या सगळ्याची माहिती विकास लवांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून…

शाईफेक आणि हल्ल्याबाबत एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना विकास लवांडे म्हणाले की, माझी आज प्रवचन सेवा होती. पुण्याजवळील हवेली तालुक्यात लोणी काळभोरच्या जवळ एका गावामध्ये, माझं आठ वाजता प्रवचन होतं, प्रवचन सेवा संपवून मी दहा वाजता बाहेर पडलो, मला रस्त्यात एकांतात तीन- चार गाड्या एकदम आल्या, त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून खाली उतरवलं, त्यामध्ये संग्राम भंडारी हा व्यक्ती मी ओळखला, उरुळी कांचनमधील अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक ओळखायला आला बाकीचे सगळे अनोळखी गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत स्मशानभूमीच्या शेजारी नेलं, मला तिथे त्यांनी रिवॉल्वर दाखवली. आवाज करायचा नाही वगैरे सांगितलं. तुझा मी खात्मा करणार आहोत असेही ते बोलत होते, आमच्या गुरूला तू का बोललास. असंही ते मला बोलले त्यानंतर माझ्या अंगावर एकदम दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या ओतायला सुरूवात केली, मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ते निघून गेले, आजूबाजूचे लोक जमायला लागल्यावर ते लोक पळून गेले, तुझा खात्मा करणार, सावध रहा असंही त्यांनी वक्तव्य केलं, असं विकास लवांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

म्हणून मी वाचलो

तर वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही धर्मांध विचाराचे लोक आहेत, वर्ण वर्चस्ववादी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे नाहीत अशा लोकांना माझ्या भूमिकेने कदाचित ते अस्वस्थ होत असावे, त्याच्यातूनच संग्राम भंडारी यांनी संगमनेरमध्ये हैदोस घातला होता. त्यावेळी तो गुंड घेऊन आला होता, वारकरी संप्रदायातील घुसकरांच्या संदर्भात वक्तव्यामुळे तो आमच्या गुरूला असं का बोलला वगैरे बोलत होता, त्यामुळेच त्याने माझ्यावर हल्ला केला असावा, लोक तिथे जमायला लागले म्हणून मी वाचलो. माझा ड्रायव्हर सोबत होता त्याच्यामुळे मी वाचलो. नाहीतर आज माझा खात्मा झाला असता, असे विकास लवांडे यांनी म्हटले आहे. जे हल्लेखोर होते, त्यांची आणि माझी काही ओळख नाही. मी त्यांना ओळखत नाही. मी आत्ता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे, पोलीस माझी फिर्याद घेत आहेत, मी पोलीस स्टेशन मध्ये बसून आहे, जोपर्यंत त्या सर्वांना अटक होत नाही जे काही 15 जण होते, तीन-चार गाड्या होत्या, तोपर्यंत मी इथून उठणार नाही, माझा सत्याग्रह आहे, त्यांना अटक होईपर्यंत सुरू राहील असेही पुढे विकास लवांडे यांनी म्हटले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यावरून दोन मतप्रवाह दिसून आले. माजी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हल्ल्याचा निषेध तर प्रवक्ते सूरज चव्हाण यांचाकडून लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख. लवांडे यांच्यावर आज सकाळी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडुन काळी शाई टाकत हल्ला केला.

माजी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हल्ल्याचा निषेध

माजी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे, पोस्ट करत मिटकरींनी म्हटलं की, “राष्ट्रवादी कांग्रेस (श.पवार साहेबांच्या)पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे एकट्यात गाठून स्वतःला वारकरी म्हणवुन घेणाऱ्या झुंडशाहीने ज्याप्रकारे गुंड शाही केली ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता?“कुण्याही जीवाचा न घडो मत्सर” व “जो जे वांछील तो ते लाहो” असे वैश्विक पसायदान मागणारे “तुकोबा ज्ञानोबा” अशा धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्या कपाळ करंट्याना मेल्यावरही कळणार नाहीत.#निषेध”.

सूरज चव्हाण यांचाकडून लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख

सूरज चव्हाण यांचाकडून लवांडे यांचा बोगस वारकरी म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे, पोस्ट करत त्यांनी म्हटलं की, संग्राम भंडारे जेवढे बोगस ह.भ.प आहेत विकास लवांडे सुद्धा तेवढेच बोगस ह.भ.प.आहेत अशा लोकांमुळे वारकरी सांप्रदाय बदनाम होतोय.सर्वसामान्य जनेतचा विश्वास असेलेल्या वारकरी सांप्रदायला राजकीय अड्डे बनवू नका.विश्वस्ताने दोघांवर पण बंदी आणावी. #जाहीर निषेध

 रोहिणी खडसेंनी व्यक्त केला संताप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे हे तालुका हवेली येथे एका प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि त्यांच्या काही भाडोत्री गुंडांनी लवांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला आहे. १०-१५ लोकांनी एकत्र येत हाणामारी केली तसेच दोघा तिघांकडे पिस्तूलही होती. या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच गृह विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. विचारांची लढाई ही विचारांनी लढायला हवी पण वारकरी संप्रदायात काही अविचारी माणसं घुसली आहेत. जी जाणीवपूर्वक समाजात विष पेरण्याचे काम करत आहे. आम्ही वारंवार या विषयावर बोललो आहे. विकास लवांडेंवरील हल्ला हा त्याचा सबळ पुरावा आहे.‌ अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी होत आहे. हे वेळीच थांबले पाहिजे!”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विकास लवांडेंवर दुधाचा अभिषेक

ज्या लोणीकाळभोर येथे विकाल लवांडे यांच्यावर हा शाईफेकीचा प्रकार झाला. तिथेच लोणीकाळभोर येथील कार्यकर्त्यांना त्यांना दुधाने अंघोळ घातली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment