बुकिंग करूनही गॅस सिलिंडर मिळत नसेल तर तक्रार करा; कंपन्यांचे टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जाहीर
गॅस सिलिंडरची बुकिंग करूनही डीलरकडून वेळेत सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी थेट संबंधित गॅस कंपनीकडे तक्रार नोंदवू शकतात. कंपन्यांनी ग्राहकांसाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.
ग्राहकांना सिलिंडर वितरणात अडचण येत असल्यास किंवा डीलरकडून विलंब होत असल्यास खालील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार करता येईल.
हेल्पलाइन क्रमांक:
भारत गॅस: 1800-22-4344 (टोल फ्री)
इंडेन गॅस: 1800-2333-555 (टोल फ्री)
एचपी गॅस: 1800-2333-555 (टोल फ्री)
ग्राहकांनी बुकिंगची पावती, ग्राहक क्रमांक किंवा बुकिंग नंबर जवळ ठेवून तक्रार नोंदवावी. तक्रार केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येते.
गॅस वितरणात अनियमितता आढळल्यास ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी पुढे येऊन अधिकृत हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




