---Advertisement---

लाडक्या बहिणींना धक्का! केवायसीसाठी “सेक्स”ची मागणी, महाराष्ट्र हादरला

April 12, 2026 1:06 PM
---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. केवायसी (KYC) करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोण आहे नराधम

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोकूळ चव्हाण हा महिलांच्या घरी जाऊन “केवायसी करून देतो” असे सांगत संपर्क साधत होता. याच बहाण्याने त्याने एका महिलेपाशी अश्लील मागणी केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर दुसऱ्या एका महिलेला “निवृत्ती वेतन व सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो” असे आमिष दाखवत प्रेमसंबंधाची मागणी केल्याचेही समोर आले आहे.

या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित महिलेने धाडस दाखवत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी गोकूळ चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, अशा प्रकारे फसवणूक किंवा गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

रोहिणी खडसेंची मागणी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकारने अशा व्यक्तिंवर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा अशी हरकत कोण करणार नाही, असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे. तसेच, लाडकी बहिण योजनेतील जाचक अटीही रद्द कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

महिलांनी काय काळजी घ्यावी?

  • अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना खात्री करून घ्या
  • सरकारी कामासाठी अधिकृत ओळखपत्र तपासा
  • संशयास्पद वर्तन दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा
  • महिलांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धाडसाने समोर गेले पाहिजे किंवा पोलिसांची मदत घेतली पाहिजे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment