---Advertisement---

VIDEO- महिला आरक्षण आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम, नागरिकांचे हाल; मंत्री महाजनांना महिलेने झापले

April 22, 2026 8:07 AM
---Advertisement---

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यावर उतरून विरोधकांच्या विरोधात आंदोलन करू लागली आहे. मात्र गल्ली ते दिल्ली आंदोलन छेडण्यात आले आहे. मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत २०२९ मध्ये हे विधेयक मंजूर होईल असे म्हटले. तसेच विधेयक नामंजूर होण्यास विरोधकांना जबाबदार धरलं.

भाजप महायुतीचं आंदोलन

काल मुंबईतील वरळी डोम येथे भाजप महायुतीच्यावतीने जन आक्रोश महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं, मात्र, याच संमलेनासाठी जाताना आंदोलकांकडून वाहतूक कोंडी झाली. यामुळे एका महिलेनं चक्क मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबईत भाजपकडून महिलांच्या सन्मानासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी वाहतूक कोंडी झाली.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाट मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना उशीर झाला, ताटकळत बसावे लागले. यामुळे एक संतप्त झालेल्या महिलेनं थेट मोर्चास्थळी जाऊन मंत्री महाजन यांना सुनावलं. यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये देखील वाद झाल्याचं दिसून आले आहे.

संतप्त महिलेने मंत्री महाजनांना झापलं रस्त्यावरच

महिलेनं मंत्री महाज यांच्यापुढे संताप व्यक्त करत, शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकल्याचं सांगितलं. विरोध करायचाच तर तो मैदानात करा. वाहतूक कोंडी का करत आहात? असा प्रश्न करत महिलेने महाजनांना सुनावले. महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून विरोधकांकडूनही शेअर केला जातोय. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील या व्हिडिओचा संदर्भ देत भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे.

रोहित पवारांचा टोमणा

“अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात, अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आलेत म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेन तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात. पण, खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं”, असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment