---Advertisement---

50MP सेल्फी कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीने असलेला Motorola Edge 70 Pro भारतात लाँच, Dimensity 8500 Extreme प्रोसेसर असलेला देशातील पहिला फोन

April 22, 2026 5:58 PM
---Advertisement---

मोटोरोलाने आज भारतात आपल्या पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Motorola Edge 70 Pro लाँच केला आहे. Motorola Edge 70 आणि Edge 70 Fusion नंतर या सिरीजचा हा तिसरा स्मार्टफोन ठरला आहे. विशेष म्हणजे, MediaTek Dimensity 8500 Extreme प्रोसेसरसह भारतात लाँच होणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. केवळ 6.99mm इतकी जाडी असलेला हा फोन 50MP सेल्फी कॅमेरा आणि 6500mAh बॅटरी अशा दमदार फीचर्ससह येतो.

कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाले तर Motorola Edge 70 Pro मध्ये MediaTek Dimensity 8500 Extreme हा लेटेस्ट प्रोसेसर देण्यात आला आहे. हा चिपसेट 4nm फॅब्रिकेशनवर आधारित असून याचा क्लॉक स्पीड 3.4GHz पर्यंत आहे. .

या फोनमध्ये 6.8 इंचाचा 1.5K Extreme AMOLED कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 5200nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. या स्क्रीनवर ‘वॉटर टच’ फिचर देण्यात आले आहे, ज्यामुळे ओल्या हातांनीही फोन वापरताना कोणतीही अडचण येत नाही.

फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात f/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा Sony LYT710 प्रायमरी सेन्सर आहे. सोबतच 50 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 50 मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा मिळतो.

बॅटरीच्या बाबतीत हा फोन अत्यंत प्रभावी आहे. यात 6500mAh ची मोठी बॅटरी असून ती 29 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा फोन चार्ज करण्यासाठी 90W TurboPower फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञान देण्यात आले आहे. तसेच हा स्मार्टफोन MIL-STD 810H मिलिटरी ग्रेड सर्टिफाइड असून त्याला धुळीपासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i वापरण्यात आला आहे.

स्मूद मल्टीटास्किंगसाठी यामध्ये LPDDR5X RAM आणि UFS 4.1 Storage तंत्रज्ञान आहे. गेमिंग दरम्यान फोन गरम होऊ नये म्हणून 4600mm² चे व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन Android 16 वर चालतो आणि कंपनीने यावर 3 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

किंमत आणि सेल

Motorola Edge 70 Pro च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹38,999 ठेवण्यात आली आहे. तर 12GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹41,999 आहे. Axis आणि HDFC बँक कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ₹2,000 चा डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे फोनची सुरुवातीची किंमत ₹36,999 होईल. या फोनची विक्री 29 एप्रिलपासून सुरू होणार असून तो PANTONE Tea, PANTONE Lily White आणि PANTONE Titan या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

सिद्धेश जाधव

सिद्धेश जाधव जवळपास 8 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायला आवडतं.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment