---Advertisement---

लाडकी बहिण योजना: नवीन KYC, नवीन नोंदणी सुरु?

July 3, 2026 3:54 PM
---Advertisement---

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. 2 जुलैपासून लाडकी बहिण योजनेची केवायसी आणि नवीन नोंदणी सुरु होणार आहे, अशी माहिती पसरली आहे. याबाबतचे व्हिडिओ युट्यूब, इ्न्स्टावर पाहायला मिळत आहेत. शिवाय, अनेक कॉम्प्युटर सेंटरवालेही याबाबतचे स्टेट्स ठेवत आहे. गंभीर बाब म्हणजे काही आशा वर्कर यांनीही याबाबतचे पोस्टर व्हॉट्सअप स्टेटला ठेवले आहेत.

माहिती खोटी

पण लाडक्या बहिणींना सावध व्हा. नवीन kyc, लाडकी बहिण योजनेची नवीन नोंदणी सुरु झालेली नाही. तुम्ही जर असे व्हिडिओ पाहिले असतील. स्टेट्स पाहिले असतील तर ते खोटे आहेत. सध्या नवीन kyc किंवा नवीन नोंदणी सुरु झालेली नाही.

सरकारी घोषणा नाही

नवीन केवायसी, नवीन नोंदणी बाबतची सरकारी घोषणा झालेली नाही. कोणत्याही जबाबदार आणि अधिकृत व्यक्तिने याबाबतची माहिती दिलेली नाही. लाडकी बहिण योजनेच्या सर्व अपडेट्स महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवर जाहीर करत असतात. पण नवीन केवायसी आणि नवीन नोंदणी बाबत त्यांनी कोणतीही अपडेट जाहीर केलेली नाही.

लाडकी बहिण वेबसाईटवरही अपडेट नाही

लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटवरही अद्याप केवायसीबाबत काही अपडेट दिसत नाही. त्यामुळे सध्या नवीन केवायसी, नवीन नोंदणी सुरु झाली असल्याची माहिती सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल तर ती एकदम खोटी आहे. अधिकृत माहितीसाठी रयत न्यूज पोर्टल पाहत रहा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment