---Advertisement---

वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप चोरणारी टोळी जेरबंद

Pune Rural News: वालचंदनगर पोलिसांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन आणि मोटार पंप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ३ आरोपींना अटक करून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

August 4, 2026 7:07 PM
---Advertisement---

पुणे ग्रामीण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पिकअप वाहन तसेच मोटार पंप चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, चारचाकी पिकअप वाहन, मोटार सबमर्सिबल पंप तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रॅक्टर यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटार पंप आणि पिकअप वाहनांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एम. संदीपसिंग गिल यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने माहितीदारांचे जाळे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तांत्रिक तपासातून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

तपासादरम्यान आरोपी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पिकअप वाहन आणि मोटार पंप चोरी करून त्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे परिसरातील अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

वालचंदनगर पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे.

  • जयदीप नानासो घोळवे (वय २२), रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे
  • मेघराज नानासो ओंबासे (वय २२), रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे
  • आकाश विलास शिंदे (वय २३), रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून पोलिसांनी खालील साहित्य जप्त केले आहे.

  • एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर
  • एक चारचाकी ट्रॅक्टर ट्रॉली
  • एक महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन
  • एक मोटार सबमर्सिबल पंप
  • गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रॅक्टर

या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत २५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?

१) गु.रजि. नंबर २२५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
२) गु.रजि. नंबर ०५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
३) गु. रजि. नंबर ८१/२०२६ भारतीय न्याय संहित २०२३ चे कलम ३०३ (२)

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण कारवाई संदीपसिंग गिल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग) आणि चेतन कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पोलिस पथकाने केली यशस्वी मोहीम

बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल माणेर, अजित भाग्यवंत, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी केली आहे. सदर कामगिरी बद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment