---Advertisement---

भिगवणच्या तेजस्विनीची थेट ‘नासा’ला भरारी! इंदापूर तालुक्यातून एकमेव विद्यार्थिनी

August 15, 2026 11:51 PM
---Advertisement---

भिगवण : पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिगवण येथील विद्यार्थिनी तेजस्विनी प्रविण जमदाडे हिची अमेरिकेतील जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था NASA (नासा) येथे होणाऱ्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण इंदापूर तालुक्यातून नासा अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या तेजस्विनीने मिळवलेले हे यश उल्लेखनीय असून, तिच्या या निवडीमुळे भिगवणसह इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेजस्विनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी तेजस्विनीचे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment