---Advertisement---

भिगवणमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

March 14, 2026 6:40 PM
---Advertisement---

भिगवण: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भिगवण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

भिगवण परिसरात अलीकडे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

तसेच हेल्मेटचा वापर करणे, ट्रिपल सीट प्रवास टाळणे आणि सुरक्षित वाहन चालविणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतुकीतील अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Omkar Wagh

ओंकार वाघ, महाराष्ट्र टाइम्समध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ पासून पत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांना डिजीटल मीडियामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment