---Advertisement---

डाळजच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 300 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

July 23, 2026 9:40 PM
---Advertisement---

डाळज, ता. इंदापूर (प्रतिनिधी): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, डाळज येथे सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

लाईफ लाईन हॉस्पिटल, तक्रारवाडी यांच्या सहकार्याने तसेच हॉस्पिटलचे प्रमुख मा. डॉ. संजयकुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात सुमारे ३०० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमाला शाळा समितीचे निमंत्रित सदस्य व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डी. एन काका जगताप तसेच मुख्याध्यापक मोहन इंगळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिबिराच्या आयोजनात योगदान देणाऱ्या डॉक्टर व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हेगडे एम एन यांनी आभार व्यक्त केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यापिका योगिता महेश वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या डॉक्टर, मान्यवर, पालक आणि सर्व सहभागींचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या उत्तम आरोग्यालाही प्राधान्य देण्याच्या उद्देशाने भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment