---Advertisement---

गटाराचे पाणी सोडले गावच्या विहिरीत, ग्रामपंचयातीचा अजब कारभार

April 6, 2026 2:23 PM
---Advertisement---

पुणे जिल्ह्यातील चिंबळी (माजगांव) ग्रामपंचयातीचा अजब कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे गाव विहिरीत ड्रेनेज सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी उपोषण पुकारण्यात आलं आहे.

आंदोलक नारायण पवार व इतर मागासवर्गिय दलित बांधवांनी यासाठी उपोषण सुरु केले आहे. आजपासून या उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rayat News (@rayatnews)

उपोषणातील मागण्या काय आहेत?

* सार्वजनिक विहीरीमधील गटारचे दूषित पाण्याचे प्रतिबंधात्मक त्वरित उपाय करावा व विहीर निर्मळ व स्वच्छ करून विहीरीच्या पाण्याचा वापर करण्यात यावा.
* ग्रामपंचायत ने चुकीच्या कामासंदर्भात वापरलेल्या भूमिगत गटार योजनेच्या निधीची चौकशी व्हावी.
विहिरी लगत अतिक्रमण काढावे व घातपात टाळावा.

कुठे आहे उपोषण?

सोमवार दि.६/४/२०२६ रोजी
*स्थळःपुणे जिल्हा परिषद, पुणे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment