---Advertisement---

भारतात पहिल्यांदा! हार्दिक पांड्याच्या गॅरेजमध्ये आली कोट्यवधींची लक्झरी कार

April 6, 2026 12:38 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराऊंडर Hardik Pandya याची लक्झरी कार्सची आवड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. Mumbai Indians चा कर्णधार असलेल्या हार्दिकने अवघ्या सहा महिन्यांत चौथी महागडी कार खरेदी करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, नुकतीच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च झालेली ही कार घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे, ज्यामुळे त्याच्या या खरेदीची अधिक चर्चा रंगली आहे.

हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिकासोबत शोरूममध्ये पोहोचला होता आणि त्याने स्वतः या नव्या कारची डिलिव्हरी घेतली. यावेळी त्याच्या स्टाइलिश लूक आणि लक्झरी लाइफस्टाइलची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्याने यावेळी Mercedes-Benz V-Class ही प्रीमियम एमपीव्ही आपल्या कलेक्शनमध्ये समाविष्ट केली. सुमारे १.४ कोटी रुपयांची ही गाडी खास फॅमिली ट्रॅव्हलसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या कारमध्ये प्रशस्त केबिन, रीक्लायनिंग सीट्स, अ‍ॅम्बियंट लाईटिंग, अ‍ॅडव्हान्स्ड इन्फोटेनमेंट सिस्टम आणि उच्च दर्जाचा आराम मिळतो. लांब प्रवासासाठी ही कार अतिशय आरामदायक मानली जाते.

 

हार्दिकच्या गॅरेजमध्ये आधीपासूनच अनेक लक्झरी आणि सुपरकार्सचा ताफा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने Land Rover Defender खरेदी केली होती, जी त्याने आपल्या मुलाला गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. तसेच त्याच्याकडे Ferrari 12Cilindri सारखी हाय-परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार असून तिची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. याशिवाय Lamborghini Urus ही दमदार आणि स्टायलिश एसयूव्हीही त्याच्या कलेक्शनमध्ये आहे, जी त्याच्या वेग आणि लक्झरीच्या आवडीचे प्रतीक मानली जाते.

हार्दिक पांड्या केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही त्याच्या स्टाइल, फॅशन आणि लक्झरी लाइफस्टाइलमुळे सतत चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक नव्या खरेदीकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. या नव्या मर्सिडीज कारच्या खरेदीमुळे त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी एक प्रीमियम गाडीची भर पडली असून, सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Omkar Wagh

ओंकार वाघ, महाराष्ट्र टाइम्समध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ पासून पत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांना डिजीटल मीडियामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment