आयपीएल 2026 मधील 30 वा सामना गुजरात जायन्ट्स विरूध्द मुंबई इंडियन्स अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 5 गडी गमावत गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तिलक वर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले; त्याने अवघ्या 45 चेंडूंमध्ये 101 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकांचा समावेश होता. नमन धीरने 45 धावांचे योगदान दिले. रोहित शर्माऐवजी संघात स्थान मिळालेल्या पदार्पणवीर दानिश मालेवार स्वस्तात बाद झाला. गुजरात टायटन्सच्या (GT) वतीने, कागिसो रबाडाने 3 बळी घेतले. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातने पहिल्याच चेंडूवर आपली पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहने साई सुदर्शनला बाद केले, जो झेलबाद झाला. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सध्या दहाव्या स्थानावर आहे.
तिलक वर्माचे पहिले शतक, मुंबईचे गुजरातसमोर समाधानकारक लक्ष्य
April 20, 2026 9:58 PM
---Advertisement---







