---Advertisement---

वालचंदनगर पोलिस स्टेशनमधील पीएसआय रतिलाल चौधर सेवानिवृत्त

June 6, 2026 11:01 PM
---Advertisement---

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल राजाराम चौधर यांनी ३७ वर्षे ४ महिने २९ दिवसांची शासकीय सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौधर यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सेवाकाळातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांशी सुसंवाद ठेवण्यासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा झाली. त्यांची सेवा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment