---Advertisement---

गरीबांना मिळतेय 4 एकर शेती मोफत, सरकारची दणकेबाज योजना

May 22, 2026 4:34 PM
---Advertisement---

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

शासन निर्णय – GR

राज्य पुरस्कृत योजना

  • सदर योजना ही सन 2004 पासून राबविण्यात येत आहे.

योजनेचा उद्देश

  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन शेतमजूरांना जमीन उपलब्ध करुन देणे

योजनेच्या प्रमुख अटी

  • सदर योजना 100% शासन अनुदानित आहे.
  • जिरायत जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर रु.5 लाख आणि बागायत जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर 8 लाख इतकी कमाल मर्यादा आहे.
  • वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे.
  • योजनेंतर्गत 4 एकर जिरायत अथवा 2 एकर बागायत जमीन

प्राधान्यक्रम घटक

  • दारिद्रय रेषेखालील भूमिहिन अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ( परित्यक्ता स्त्रियांकरिता )
  • दारिद्रय रेषेखालील भुमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द ( विधवा स्त्रियांकरिता )
  • अनुसूचित जाती/जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत अनुसूचित जातीचे अन्याय ग्रस्त व्यक्तीस

लाभाचे स्वरूप

  • या योजनेंतर्गत प्रति लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेत जमीन शासनातर्फे वाटप करण्यांत येते.
  • त्याकरीता जमिन खरेदीसाठी 50% शासकीय अनुदान व 50% दहा वर्षे मुदतीचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत होते. कर्जाची परत फेड जमीन वाटप केल्यापासून 2 वर्षानंतर सुरु करण्यात येते.

लाभार्थी

अ. क्र. वर्ष प्राप्त तरतूद खर्च एकूण जमीन वाटप एकूण लाभार्थी
1 2021-22 5000.00 5000.00 463.60 150
2 2022-23 7350.00 7350.00 289.00 376
3 2023-24 4370.00 4370.00 535.98 300
4 2024-25 2500.00 2500.00 जमिन खरेदी व लाभार्थी निवड प्रक्रिया सूरू
5 2025-26 10000.00 0.00 0.00 0

संपर्क कार्यालय

संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

लाभार्थी:

वर नमूद केल्याप्रमाणे

फायदे:

वर नमूद केल्याप्रमाणे

अर्ज कसा करावा

संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त यांचेक

वेबसाईट- https://sjsa.maharashtra.gov.in

राज्यात राहणार्‍या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

आवश्यक कागदपत्रे –

विहित नमुन्यातील अर्ज फोटोसह भरावा.

– अर्जदार अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याचा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहित प्रमाणपत्र

– रहिवासी दाखला

– रेशन कार्ड झेरॉक्स- आधारकार्ड, मतदान कार्ड, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला

– मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला

– वय ६० वर्षाखालील असल्याचा वयाचा पुरावा

– लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबत विहित प्रमाणपत्र

– शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment