कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
राज्य पुरस्कृत योजना
- सदर योजना ही सन 2004 पासून राबविण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन शेतमजूरांना जमीन उपलब्ध करुन देणे
योजनेच्या प्रमुख अटी
- सदर योजना 100% शासन अनुदानित आहे.
- जिरायत जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर रु.5 लाख आणि बागायत जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर 8 लाख इतकी कमाल मर्यादा आहे.
- वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे.
- योजनेंतर्गत 4 एकर जिरायत अथवा 2 एकर बागायत जमीन
प्राधान्यक्रम घटक
- दारिद्रय रेषेखालील भूमिहिन अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ( परित्यक्ता स्त्रियांकरिता )
- दारिद्रय रेषेखालील भुमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द ( विधवा स्त्रियांकरिता )
- अनुसूचित जाती/जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत अनुसूचित जातीचे अन्याय ग्रस्त व्यक्तीस
लाभाचे स्वरूप
- या योजनेंतर्गत प्रति लाभार्थ्यास 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेत जमीन शासनातर्फे वाटप करण्यांत येते.
- त्याकरीता जमिन खरेदीसाठी 50% शासकीय अनुदान व 50% दहा वर्षे मुदतीचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत होते. कर्जाची परत फेड जमीन वाटप केल्यापासून 2 वर्षानंतर सुरु करण्यात येते.
लाभार्थी
| अ. क्र. | वर्ष | प्राप्त तरतूद | खर्च | एकूण जमीन वाटप | एकूण लाभार्थी |
|---|---|---|---|---|---|
| 1 | 2021-22 | 5000.00 | 5000.00 | 463.60 | 150 |
| 2 | 2022-23 | 7350.00 | 7350.00 | 289.00 | 376 |
| 3 | 2023-24 | 4370.00 | 4370.00 | 535.98 | 300 |
| 4 | 2024-25 | 2500.00 | 2500.00 | जमिन खरेदी व लाभार्थी निवड प्रक्रिया सूरू | |
| 5 | 2025-26 | 10000.00 | 0.00 | 0.00 | 0 |
संपर्क कार्यालय
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त यांचेक
वेबसाईट- https://sjsa.maharashtra.gov.in
राज्यात राहणार्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
आवश्यक कागदपत्रे –
– विहित नमुन्यातील अर्ज फोटोसह भरावा.
– अर्जदार अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याचा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहित प्रमाणपत्र
– रहिवासी दाखला
– रेशन कार्ड झेरॉक्स- आधारकार्ड, मतदान कार्ड, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला
– मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला
– वय ६० वर्षाखालील असल्याचा वयाचा पुरावा
– लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबत विहित प्रमाणपत्र
– शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र







