नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक उर्फ ‘कॅप्टन’ खरात याच्या अटकेनंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी आता सगळं पुराण उकरून काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक बडे मासे गळाला लागणार आहेत.
तपासादरम्यान पोलिसांना काही पेनड्राइव्ह मिळाले असून त्यामध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी लोक किंवा मोठे जाळे आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
बलात्कारी खराकचे राजकीय संबंध-
अशोक खरात याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्ती जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच राजकीय स्वरूप मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हटलंय अंधारेंनी?
सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे की, अशोक खरात याच्याशी काही राजकीय व्यक्तींचे जवळचे संबंध होते. यामध्ये काही मोठ्या नेत्यांची नावेही त्यांनी सूचित केली. तसेच, यापूर्वी खरातवर आरोप झाले असताना संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हे वाचलं का? महाराष्ट्राचा आसारामा… महिलांना स्वतःची लघवी पाजायचा अन्..
अंधारे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, “महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांनी जर अशा प्रकरणात निष्क्रियता दाखवली, तर जबाबदारी कोणाची?” असा थेट प्रश्न उपस्थित केला.
अंधारेंची फेसबुक पोस्ट-
महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…?” असं अंधोरेंनी म्हटलं आहे.
रुपाली चाकणकरांवर टीका-

या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांचा खरात याच्याशी संबंध असल्याच्या चर्चा आणि काही व्हिडिओ समोर येणे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
दरम्यान, चाकणकर यांनी या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देत पोलिस तपासावर विश्वास असल्याचे सांगितले आहे.
पुढे काय?
कॅप्टन खरात प्रकरण आता केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित न राहता राजकीय वादात परिवर्तित झाले आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






