लाडक्या बहिणींची आता तारांबळ उडाली आहे. नेट कॅफे, तसेच महिला व बालविकास कार्यालयाच्या बाहेर रांगाच्या रांगा लावल्या आहेत. कारण, ई केवायसीमधील झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत आहे.
त्यामुळे महिलांच्या रांगा लागल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

मात्र,अनेक महिलांच्या अर्जामध्ये ई-केवायसी (E-KYC) किंवा बँक खात्याच्या केवायसीमध्ये चुका झाल्या असल्याने त्यांना लाडक्या बहिणीच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागलं. आता खबरदारी म्हणून या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण भागातूनही महिला मोठ्या संख्येने शहरात येत आहेत.

अनेक लाडक्या बहिणींना मागच्या चार ते पाच महिन्यांपासून हप्त्याची रक्कम मिळत नसल्याने वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळे उद्या (31 मार्च) शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान उद्या 31 मार्च रोजी ही मुदत संपत असल्याने तत्पूर्वीच लाडक्या बहिणी केवायसीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभाग गाठत आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार का? याकडे सर्वच लाडक्या बहिणीचं लक्ष लागले. केवायसीत चुका असल्याने लाभार्थी लाडक्या बहिणींना यापूर्वेच काही हप्ते मिळालेले नाहीत. महिलांनी लवकरात लवकर आपल्या चुका दूर कराव्या असे आवाहन केले जात आहे.

ज्या लाडक्या बहिणींनी प्रथम केवायसी केली नाही. त्यांना पुन्हा केवासयी दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे पैसे बंद करण्यात आले आहेत. तर, ज्या महिलांची केवासयी चुकली होती. त्यांना दुरुस्तीचा पर्याय दिसत आहे. पण त्यांनीही आता केवासयी केली नाही तर त्यांची मासिक 1500 रुपयांचा आर्थिक लाभ कायमचा बंद होणार आहे.




