सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने सायंकाळी दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. तर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन चौक रोड, शिवाजी मंडई परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले. मारुती चौकातील गणेश मंगल कार्यालयासमोरही पाणी साचले. तसेच अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचून सुद्धा राहिले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. अनेक भागांतील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. मात्र या पावसामुळे सांगलीकरांची मोठी दैना उडाली आहे.
---Advertisement---


