आजची तरुणाई कितीही सुशिक्षित झाली असली तरी जुन्या आणि चुकिच्या परंपरेच्या फेऱ्यातून बाहेर निघताना दिसत नाही, याची उदाहरणे आपण रोज पाहत, बातम्यातून वाचत आहोत. सध्याचं चालू आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याला बळी पडलेला सुशिक्षित वर्ग. त्यातच सध्या हुंडा मागण्याची पद्धतही कमी झालेली दिसत आहे.
हैदराबादच्या मियापूर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे लग्नाच्या 50व्या दिवशीच प्रेमविवाहाचा फाशी घेऊन शेवट झाला आहे.
लव्ह मॅरेजचा फाशीने शेवट
मूळची बिहारची असलेली सॉफ्टवेअर इंजिनिअर इशिका यादव हिने, मध्य प्रदेशातील नीरज बन्सल याच्याशी २० फेब्रुवारी २०२६ रोजी विवाह केला. हा एक प्रेमविवाह होता, ज्याची सुरुवात २०२० मध्ये सोशल मीडियाद्वारे झाली होती.
हुंडाबळी
हुंडाप्रथा ही भारतीय समाजातील एक अत्यंत घातक सामाजिक कुप्रथा आहे, जी आजही आपल्या सामूहिक मानसिकतेवर आणि सामाजिक रचनेवर खोलवर प्रभाव टाकत आहे. ही प्रथा केवळ स्त्रियांच्या प्रतिष्ठेलाच धक्का लावत नाही, तर समाजात विषमता आणि अन्यायही कायम राखते.ू
लग्नाच्या अवघ्या एका महिन्याच्या आतच, अतिरिक्त हुंड्याची मागणी करण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले.
हा छळ आणखी सहन करणे अशक्य झाल्यामुळे, इशिकाने आपल्या राहत्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.



