---Advertisement---

लिंगपिसाट बाबा…रुपाली चाकणकरांना झटका; फडणवीसांची कारवाई…

March 20, 2026 3:32 PM
---Advertisement---

अशोक खरात प्रकरणी आता रुपाली चाकणकरांना मोठा झटका बसला आहे रुपाली चाकणकरांनी राजीनामा (Rupali Chakankar Resignation) द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिलांचे लैंगिक शोषण

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर चाकणकरांवर टीकेचा भडीमार झाला होता. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रुपाली चाकणकर राजीनामा देणार

रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. आता रुपाली चाकणकरांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. रुपाली चाकणकरांनी आधी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली.

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात येत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. राज्यातल्या महिला नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवारांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण त्यांच्याकडून हा निर्णय झाला नाही याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

रुपाली चाकणकरांची प्रथमदर्शनी या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आपण खरातांच्या ट्रस्टमध्ये सहभागी होतो. अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला काही कल्पना नसल्याचं मत रुपाली चाकणकरांनी व्यक्त केलं होतं.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment